Mumbai Air Pollution : मुंबईकरांनो जरा जपून.. फटाक्यांच्या आतषबाजीनंतर मुंबईची हवा ‘वाईट’ श्रेणीत

Mumbai Air Pollution : मुंबईकरांनो जरा जपून.. फटाक्यांच्या आतषबाजीनंतर मुंबईची हवा ‘वाईट’ श्रेणीत

| Updated on: Oct 22, 2025 | 10:25 AM

लक्ष्मी पूजनानिमित्त झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईची हवा मंगळवारी वाईट श्रेणीत नोंदली गेली. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 221 वर पोहोचला आहे. शहरासह उपनगरांमध्येही प्रदूषणाचा परिणाम जाणवला असून, दादर समुद्रकिनारपट्टीवर प्रदूषणाची धुक्यासारखी चादर पसरल्याचे चित्र दिसले.

लक्ष्मी पूजनानिमित्त नागरिकांनी केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला आहे. मंगळवारी मुंबईची हवा वाईट श्रेणीत नोंदली गेली असून, मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 221 वर पोहोचला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही फटाक्यांचा वातावरणावर परिणाम झाल्याचे दिसून आले. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावल्याचे चित्र होते. दादर समुद्रकिनारपट्टीवर सध्या धुक्याची चादर दिसली तरी, प्रत्यक्षात हे धुकं नसून मुंबईतील प्रदूषण असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी केली जाते आणि फटाक्यांची आतषबाजी देखील मोठ्या प्रमाणावर होते. याचाच परिणाम म्हणून हवेची गुणवत्ता बिघडली आहे. काही प्रमाणात पाऊस प्रदूषण कमी करण्यास मदत करत असला तरी, वारंवार वाजवले जाणारे फटाके आणि मोठ्या प्रमाणात होणारी आतषबाजी मुंबईतील प्रदूषणात वाढ करत आहे.

Published on: Oct 22, 2025 10:25 AM