Mumbai | इमारतीत 20 टक्के कोरोनाबाधित आढळल्यास इमारत, मुंबई मनपाचा निर्णय
इमारत, विंगमध्ये 20 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कोविडबाधित रुग्ण आढळल्यास ती विंग, इमारत सिल करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. याबाबत आज मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले आहेत. इमारतीच्या व्यवस्थापन मंडळाने या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई : इमारत, विंगमध्ये 20 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कोविडबाधित रुग्ण आढळल्यास ती विंग, इमारत सिल करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. याबाबत आज मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले आहेत. इमारतीच्या व्यवस्थापन मंडळाने या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
इमारत, विंग सिल करण्याबाबत मार्च महिन्यात घेतलेल्या निर्णयात सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वी इमारतीत, विंगमध्ये 10 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यावर सील करण्यात येत होती. आता 20 टक्के घरातबाधीत आढळल्यावर इमारत सिल करण्यात येणार आहे.
