Mumbai Rain :  मुंबईची तुंबई… मध्य रेल्वेची वाहतूक तासभर उशिरानं.. स्टेशनवर मोठी गर्दी, पावसानं उडवली दाणादाण

Mumbai Rain : मुंबईची तुंबई… मध्य रेल्वेची वाहतूक तासभर उशिरानं.. स्टेशनवर मोठी गर्दी, पावसानं उडवली दाणादाण

| Updated on: May 26, 2025 | 1:22 PM

रेल्वे रूळावर पाणी साचल्याने ट्रेनची वाहतूक ठप्प होती. त्यामुळे काही रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले होते. तर काही प्रवाशांनी रुळावरून पायी चालत ऑफिस गाठलं.

मुंबईत पहाटेपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडवून दिली आहे. पहाटेपासून मुंबईत पडणाऱ्या पावसाच्या संततधारेमुळे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले. त्यामुळे रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प होती. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी रेल्वे स्थानक ते भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे वाहतूक बंद होती. मात्र पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरी रेल्वेची वाहतूक अद्याप सुरळीत झाली नसल्याची माहिती मिळतेय. मुंबईसह उपनगरात सखल भागात पाणी साचल्याने मध्य रेल्वे वाहतूक 1 तास उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मस्जिद स्थानकावर पाणी साचल्यामुळे रेल्वे एका जागी उभ्या असल्याने प्रवाशांनी वाट काढत जवळील स्टेशन गाठलं आहे तर काही रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचेही पाहायला मिळाले. आज आठवड्याचा पहिलाच दिवस असून मुंबईतील पावसाने मुंबईकरांची मोठी गैरसोय झाली आहे.

Published on: May 26, 2025 01:22 PM