Malad News :  मालवणीमधील टाऊनशिप शाळेवरून राजकारण तापलं, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गर्दी, गोंधळामुळं पोलिसांची दमछाक

Malad News : मालवणीमधील टाऊनशिप शाळेवरून राजकारण तापलं, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गर्दी, गोंधळामुळं पोलिसांची दमछाक

| Updated on: Aug 23, 2025 | 11:57 AM

मालाड मधील मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला काँग्रेलकडून विरोध करण्यात येत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना या ठिकाणी मोठी गर्दी केल्याने पोलिसांना यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागतेय. तर काही कार्यकर्त्ये पालिसांच्या ताब्यात आहेत.

मालवणीतील टाउनशिप स्कूलमध्ये मंगल प्रभात लोढा यांच्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेसने आपला निषेध व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.  मालाडमधील मालवणी येथील टाउनशिप शाळेच्या खाजगीकरणावरून भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आलेत. या शाळेत मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा कार्यक्रम आधीच नियोजित होता, त्यानंतर स्थानिक काँग्रेस आमदार अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांनी मालवणी येथील टाउनशिप शाळेच्या खाजगीकरणाला विरोध करत खाजगीकरणाविरुद्ध निषेध व्यक्त केलाय.

या तणावाच्या पार्श्वभूमीवर शाळेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  मालवणी टाउनशिप शाळेच्या खाजगीकरणाविरोधात काँग्रेस आमदार अस्लम शेख हे पालकांसह निषेध व्यक्त करताना पाहायला मिळाले. दरम्यान, काँग्रेसचं हे निषेध आंदोलन सुरू होण्यापूर्वीच भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना शाळेत दाखल झाले होते. या आंदोलनामुळे परिसरात एकच तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शाळेबाहेर आणि परिसरात पोलीस फौड बंदोबस्तासाठी दिसतेय.

Published on: Aug 23, 2025 11:56 AM