Corona : मुंबईत दुप्पट रुग्णवाढ! पुन्हा मास्कसक्ती करा, टास्क फोर्सची शिफारस, तर आज मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

| Updated on: Apr 27, 2022 | 12:06 PM

कोरोना रुग्णवाढ होत असल्याचनं सरकार आणि प्रशासन पुन्हा सतर्क झालं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली.

Follow us on

मुंबई : कोरोना रुग्णवाढ (Mumbai Corona cases) होत असल्याचनं सरकार आणि प्रशासन पुन्हा सतर्क झालं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhva Thackeray with Task Force) यानी टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत राज्यात पुन्हा बंदीस्त ठिकाणी मास्क वापरण्याची सक्ती केली जावी, असा सल्ला देण्यात आला आहे. टास्क फोर्सनं तशी शिफारस या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी यांच्यासह टास्क फोर्समधील इतर सदस्य या बैठकीला हजर होते. सध्या कोरोना रुग्णवाढी मोठी नसली, तरिही रुग्णांची संख्या वाढत असल्याचं आकडेवारीतून दिसून आलं आहे. अशातच अनेक कोरोना रुग्ण घरच्या घरीच टेस्ट (Corona Home Testing kit) करुन घरच्या घरीच उपचार घेत आहेत.