Fletcher Patel | मंत्री नवाब मलिकांच्या आरोपांवर फ्लेचर पटेल, यास्मिन वानखेडे यांचं स्पष्टीकरण

| Updated on: Oct 16, 2021 | 7:37 PM

समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे? तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे? फॅमिली फ्रेंडला पंच म्हणून घेण्यामागचा वानखेडेंचा हेतू काय? असा सवाल मलिकांनी केलाय. आता प्लेचर पटेल आणि यास्मिन वानखेडे यांनी मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय.

Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई ड्रग्स प्रकरणात आता एनसीबी अधिकारी समीन वानखेडे यांच्यावर अजून एक आरोप केलाय. यावेळी मलिक यांच्याकडून फ्लेचर पटेल यांचं नाव समोर आणलं आहे. समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे? तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे? फॅमिली फ्रेंडला पंच म्हणून घेण्यामागचा वानखेडेंचा हेतू काय? असा सवाल मलिकांनी केलाय. आता प्लेचर पटेल यांनीच मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय.

‘मी एक माजी सैनिक आहे. एनसीबी आणि समीर वानखेडे हे खूप मोठं आणि चांगलं काम करत आहेत. म्हणून सैनिक फेडरेशन मुंबई अध्यक्ष म्हणून वानखेडे यांनी एनसीबीला मदत करत असतो. देशात ड्रग्स आणून तरुण पिढीला ड्रग्स अॅडिक्ट केलं जात आहे. ते रोखण्याचं काम एनसीबी करत आहे. म्हणून मी त्यांना मदत करत आहे’, असं फ्लेचर पटेल यांनी म्हटलंय.

तर कॅबिनेट मंत्री असं अनव्हेरिफाईट स्टेटमेंट देत आहेत. काही स्टेटमेंट देण्यापूर्वी त्यांनी विचार करावा. माझा भाऊ योग्य कारवाई करत आहे. मी मनसे चित्रपटच सेनेत उपाध्यक्ष आहे आणि कायदेशीर काम पाहते. माझ्या राजकीय स्टेटसचा आणि माझ्या कामाचा त्यांनी आदर करायला हवा. समाजाला ते चुकीची प्रेरणा देत आहेत, त्यांना हे समजायला हवं. पुरावे द्या आणि मग बोला, असं आव्हान यास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिकांना दिलंय.