Mumbai Local : मोठी बातमी! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दादर रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं?

| Updated on: Sep 22, 2022 | 7:55 AM

Mumbai Local News : अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना खोळंबा झालाय. अनेक एक्स्प्रेस गाड्यांनाही या तांत्रिक बिघाडाचा फटका बसलाय. एकामागोमाग एक लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या थांबलेल्याचं पाहायला मिळालंय.

Follow us on

विनायक डावरुंग, मुंबई : नोकरदार वर्गाला गुरुवारी सकाळीच नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागलंय. मुंबईतील (Mumbai Local News) मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झालीय. दादर रेल्वे (Dadar Railway Station) स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा फटका बसलाय. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झालीय. ऐन कामावर जाण्याच्या वेळीच लोकलच्या वेळपत्रकावर फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या तांत्रिक बिघाड (Central Railway News) दुरुस्त करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहेत. तसंच वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठीही शर्थीचे प्रयत्न मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना खोळंबा झाला. अनेक एक्स्प्रेस गाड्यांनाही या तांत्रिक बिघाडाचा फटका बसलाय. एकामागोमाग एक लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या थांबलेल्याचं चित्र दादार स्थानकात पाहायला मिळालंय. मध्य रेल्वेच्या दादर ते सीएसएमटी दरम्यानच्या जलद मार्गावरील वाहतुकीवर तांत्रिक बिघाडाचा फटका बसलाय.