Mumbai local Mega Block Video : मुंबईकरांनो… उद्या लोकलनं प्रवास करणार आहात? जाणून घ्या कसा असणार मेगाब्लॉक?
मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे रविवारी (16 फेब्रुवारी) आपल्या उपनगरीय रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
उद्या ट्रेनने कुठे प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण उद्या भारतीय रेल्वेच्या मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे रविवारी (16 फेब्रुवारी) आपल्या उपनगरीय रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी मुंबई ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.३५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी १०. ४८ ते दुपारी ३.३२ पर्यंत सीएसएमटी मुंबईहून सुटणाऱ्या डाऊन स्लो सेवा सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येईल आणि या लोकल सेवा भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकात थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर हार्बर मार्गावर देखील मेगाब्लॉक घेण्यात येणार असून कुर्ला ते वाशी मार्गावर काही रेल्वे संबंधित कामे कऱण्यात येणार आहेत. त्यामुळे कुर्ला ते वाशी मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरही उद्या काही रेल्वेची तांत्रिक कामे कऱण्यात येणार आहे. यासाठी बोरिवली ते गोरेगाव या रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
