Megablock News : पश्चिम रेल्वेवर 36 तासांचा मेगाब्लॉक, 162 फेऱ्या रद्द… कोणत्या वेळात प्रवाशांची होणार गैरसोय?

Megablock News : पश्चिम रेल्वेवर 36 तासांचा मेगाब्लॉक, 162 फेऱ्या रद्द… कोणत्या वेळात प्रवाशांची होणार गैरसोय?

| Updated on: May 31, 2025 | 11:23 AM

कांदिवली यार्ड येथील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी शुक्रवारी (31 मे) दुपारी 1 ते रविवारी (2 जून) मध्यरात्री 1 दरम्यान हा ब्लॉक घेण्यात आला आहे.

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर मुंबईची लाईफ लाईन अर्थात लोकल ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर आज आणि उद्या तब्बल १६२ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेवरील पाचव्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर 36 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून आज दुपारी एक वाजल्यापासून रविवारी मध्यरात्री १ पर्यंत हा ब्लॉक असणार आहे.

कांदिवली यार्डमधील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधील लोकल सेवा आणि मेल एक्स्प्रेस जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मेगा ब्लॉक दरम्यान पहिल्या दिवशी ७३ लोकल ट्रेन रद्द होणार आहे. दुसऱ्या दिवशी ही संख्या ८९ असणार आहे. रेल्वेच्या शेड्यूलमध्येही काही बदल करण्यात आला आहे. तर रविवारी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरूस्ती करण्यासाठी मेगा ब्लॉक असणार आहे.

Published on: May 31, 2025 11:23 AM