Mumbai Rain Updates : मान्सूनची धडाकेबाज एंट्री! दादरच्या हिंदमाता परिसरात साचलं गुडघाभर पाणी

Mumbai Rain Updates : मान्सूनची धडाकेबाज एंट्री! दादरच्या हिंदमाता परिसरात साचलं गुडघाभर पाणी

| Updated on: May 26, 2025 | 12:31 PM

Dadar Hindmata waterlogging : राज्यात मान्सूनची एंट्री झालेली असून पहिल्याच पावसात मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होतं आहेत.

राज्यात यंदा तब्बल 12 दिवस आधीच मान्सूनचं आगमन झालेलं आहे. मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे. दादरच्या हिंदमाता परिसरात देखील मुसळधार पावसामुळे पाणी साचलेलं आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झालेले बघायला मिळत आहे. गुडघाभर पाण्यातून वाट काढत नागरिकांना कामावर जावं लागत आहे. तर या पाण्यामुळे रस्तेवाहतूक देखील खोळंबलेली आहे.

मुंबई आणि उपनगरांना आज पहाटेपासूनच मान्सूनच्या पावसाने झोडपून काढलेलं आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे. पावसाळा सुरू झाला की दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी साठायला सुरुवात होते. यंदा देखील मान्सूनच्या पहिल्याच पावसात या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे. या पाण्यातून वाट काढत वाहनांची वाहतूक सुरू आहे. यामुळे नागरिकांचे मात्र हाल होताना दिसत आहेत.

Published on: May 26, 2025 12:31 PM