मुंबई महापालिका निकालाची मतमोजणी सुरू; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर
मुंबई महापालिकेच्या निकालाची मोजणी सुरु झाली असून, कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या अपडेटनुसार मुंबईत भाजप 26 जागांवर आघाडीवर असून ठाकरे बंधूंच्या गटाकडे 12 जागांची आघाडी आहे. मुंबईत सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई महापालिकेच्या निकालाची मोजणी सुरु झाली असून, कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या अपडेटनुसार मुंबईत भाजप 26 जागांवर आघाडीवर असून ठाकरे बंधूंच्या गटाकडे 12 जागांची आघाडी आहे. मुंबईत सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत भाजपने आघाडी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मतमोजणी जसजशी पुढे जाईल तसतसे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.निकालाच्या प्रत्येक फेरीकडे सर्वच पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत. अंतिम निकाल काही तासांत स्पष्ट होण्याची शक्यता असून त्यानंतर मुंबई महापालिकेची सत्ता नेमकी कोणाच्या हाती जाणार, हे ठरणार आहे.
Published on: Jan 16, 2026 11:04 AM
