मुंबईत भाजपचीच सत्ता, 130 पेक्षा कमी नाही; चंद्रकांतदादांचं भाकीत
राज्यातील 29 महापालिकांसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. आज निकाल लागणार आहे. थोड्याच वेळात निकालाचे अपडेट हाती येतील. मुंबईचा गड नेमका राखणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मुंबईच्या निकालाबद्दल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठा दावा केला आहे.
राज्यातील 29 महापालिकांसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. आज निकाल लागणार आहे. थोड्याच वेळात निकालाचे अपडेट हाती येतील. मुंबईचा गड नेमका राखणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मुंबईच्या निकालाबद्दल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. मुंबई महानगरपालिकेची सत्ता भाजपच्या हातात जाणार, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आम्ही 130 च्या खाली येणार नाही असा ठाम विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Published on: Jan 16, 2026 10:33 AM
