VIDEO : आंदोलकांना घेऊन पोलीस किला कोर्टात दाखल | ST Strike

| Updated on: Apr 09, 2022 | 2:21 PM

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असलेले गुणरत्न सदावर्ते यांची किला कोर्टात सुनावणी सुरु आहे. न्यायमूर्ती के जी सावंत खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी होईल. तर गुणरत्न सदारवर्ते यांच्या बाजूने महेश वाधवानी, घनश्याम उपाध्यय आणि सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील हे तिघे युक्तीवाद करत आहेत.

Follow us on

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांची प्रक्षोभक भाषणं जबाबदार आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. 7 एप्रिल रोजी सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना प्रक्षोभक विधानं केल्याचा आरोप असून याचप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबईतील किला कोर्टात या प्रकरणी सुनावणी होत आहे. आंदोलकांना घेऊन पोलीस किला कोर्टात दाखल झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असलेले गुणरत्न सदावर्ते यांची किला कोर्टात सुनावणी सुरु आहे. न्यायमूर्ती के जी सावंत खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी होईल. तर गुणरत्न सदारवर्ते यांच्या बाजूने महेश वाधवानी, घनश्याम उपाध्यय आणि सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील हे तिघे युक्तीवाद करत आहेत.