Mumbai Rain Update : मुंबईला रेड अलर्ट अन् पावसाचा जोर पुन्हा वाढला, रेल्वे वाहतुकीची काय परिस्थिती?

Mumbai Rain Update : मुंबईला रेड अलर्ट अन् पावसाचा जोर पुन्हा वाढला, रेल्वे वाहतुकीची काय परिस्थिती?

| Updated on: Sep 28, 2025 | 10:47 AM

मुंबईत रात्रभर जोरदार पावसानंतर आता पावसाचा जोर वाढला आहे. शहराला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून, मुंबई महानगरपालिकेने ६९ मिमी पावसाची नोंद केली आहे. वाहतूक आणि रेल्वे सेवा सुरळीत असली तरी, दुपारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईत रात्रभर जोरदार पावसाने हजेरी लावली असून, आता पावसाचा जोर पुन्हा वाढलेला दिसत आहे. हवामान विभागाने आज मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. मध्यरात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रात्रभरात ६९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या तरी मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलेले नाही आणि रेल्वे सेवाही सुरळीत सुरू आहे. मात्र, मध्य रेल्वेवर दुपारी ११ वाजता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आज रविवार असल्याने वाहतुकीवर फारसा परिणाम झालेला नाही. दादर परिसरासह मुंबईत पाऊस सुरूच आहे. मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे यासह एकूण सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे.

Published on: Sep 28, 2025 10:32 AM