समान नागरी कायद्यावरून राजकारण तापलं; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या सदस्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट!
काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायदा संदर्भात भाष्य केलेलं होतं आणि यानंतर हे प्रकरण चर्चेत आलेलं होतं. हा कायदा लागू करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे देश पातळीवरती मुस्लिम संघटनेकडून या कायद्याला विरोध पाहायला मिळतोय.
मुंबई : काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायदा संदर्भात भाष्य केलं आणि यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं आहे. एका घरात कुटुंबातील एका सदस्यासाठी एक आणि दुसऱ्यासाठी दुसरा कायदा असेल, तर घर चालेल का? असे वक्तव्य मोदींनी केले आहे. हा कायदा लागू करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे देश पातळीवरती मुस्लिम संघटनेकडून या कायद्याला विरोध पाहायला मिळतोय. याच संदर्भात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्य आज शिवसेना भवनात आले होते. उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकी चर्चा कशावर झाली यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…
Published on: Jun 28, 2023 06:13 PM
