मोठी बातमी! महाविकास आघाडीत ट्विस्ट; आगे, आगे देखो होता है क्या म्हणत काँग्रेसची सूचक भूमिका काय?
महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीत उमेदवारीवरून मतभेद उघड झाल्याचे चित्र समोर आले आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत होत असल्याची चर्चा होती. काँग्रेसनेही उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार असल्यास त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर न जाण्याचा निर्णय कायम ठेवत शिवसेनेतून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली. या निर्णयामुळे महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, काँग्रेसची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीत उमेदवारीवरून मतभेद उघड झाल्याचे चित्र समोर आले आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत होत असल्याची चर्चा होती. काँग्रेसनेही उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार असल्यास त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट केली होती.
मात्र, उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर न जाण्याचा निर्णय कायम ठेवत शिवसेनेतून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली. या निर्णयामुळे महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, काँग्रेसची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “आमची भूमिका आम्ही आधीच मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर चर्चांमध्ये काही अडथळे निर्माण झाले. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही,” असे सपकाळ म्हणाले. तसेच, “सर्व प्रश्नांची उत्तरे आत्ताच देणे आवश्यक नाहीत, आगे, आगे देखो होता है क्या,” असे सूचक विधानही त्यांनी केले.
एकूणच, उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव दिसून येत असून, या घडामोडींमुळे विधान परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
