Supriya Sule On Ajit Pawar | दादांचे निर्णय, दादांची स्वप्ने, दादांसोबतच गेले, माझा भाऊच राहिला नाही… सुप्रिया सुळे गहिवरल्या
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित दादांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. माझा भाऊच राहिला नाही, हेच सर्वात मोठं दु:ख आहे. दादांनी घेतलेले निर्णय, दादांची स्वप्नं – हे सगळं दादांबरोबरच गेलं. आज माझा भाऊच नाही राहिला, त्यामुळे कोण काय बोलतंय याने काय फरक पडतो?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित दादांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. माझा भाऊच राहिला नाही, हेच सर्वात मोठं दु:ख आहे. दादांनी घेतलेले निर्णय, दादांची स्वप्नं – हे सगळं दादांबरोबरच गेलं. आज माझा भाऊच नाही राहिला, त्यामुळे कोण काय बोलतंय याने काय फरक पडतो?, असा भावूक सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. सुप्रिया सुळे यांनी यावेळी संयमित भूमिका मांडली. दादांच्या पक्षाने कोणाला कोणते पद द्यायचे हा पूर्णपणे त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला अंतर्गत निर्णय घेण्याचा अधिकार असतो. कोणाला काय जबाबदारी द्यायची, हे त्यांनीच ठरवायचे, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, त्यांच्या या भावनिक वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
Published on: Feb 17, 2026 1:22 PM
Follow Us
