Nagpur News | मित्रानेच गोणीत भरलं अन् हत्या केली, शोभायात्रेतून बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय चिमुकल्यासोबत नको ते घडलं
नागपुरातील गिट्टीखदान परिसरातून बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय अथर्व मनोर प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्यांसह मिळून त्याच्या मित्रानेच केलं होतं भयंकर कृत्य... नेमकं काय घडलं?
नागपुरातील गिट्टीखदान परिसरातून बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय अथर्व मनोर प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. हनुमान जयंतीनिमित्त आयोजित शोभायात्रे दरम्यान बेपत्ता झालेला अथर्व हा एका गोणीत मृतावस्थेत आढळला. त्याच्या मृतदेहची देखील विटंबना करण्यात आलेली होती. त्यामुळे अथर्वसोबत नेमकं काय घडलं? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर या प्रकरणात तीन जणांना अटक झाली आहे. डोकं चक्रावणारी बाब म्हणजे या आरोपींमध्ये अर्थवच्या शेजारी राहणाऱ्यांसह त्याच्या मित्राचाही समावेश आहे.
अर्थव मनोरेची अत्यांत भयानक रित्या हत्या झाली यावर स्थानिकांनी आंदोलनं केली होती तसेच विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. या प्रकरणावर जलद कारवाई करत स्थानिक पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
Published on: Apr 06, 2026 3:59 PM
Follow Us
