Nagpur | नागपुरात सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांची मनपातर्फे कोरोना टेस्ट

| Updated on: Jan 08, 2022 | 5:04 PM

नागपूर जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या दोन हजारांवर पोहचली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 698 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने नागपूर मनपाकडून पुन्हा कंटेनमेंट झोनची तयारी सुरू झाली आहे.

Follow us on

नागपूर जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या दोन हजारांवर पोहचली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 698 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने नागपूर मनपाकडून पुन्हा कंटेनमेंट झोनची तयारी सुरू झाली आहे. स्थायी समितीत बॅरिकेड्स आणि टीन शेडसाठी चार कोटींचा प्रस्ताव दिला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत बॅरिकेड्स लावण्यासाठी सहा कोटींचा खर्च आला होता. एकाच परिसरातील जास्त लोक पॅाझिटिव्ह आल्यास कंटेनमेंट झोन करण्यात येणार आहे.

दुबई रिटर्न पंधरा जण पॉझिटिव्ह

दिवसाआड देशाबाहेरून प्रवास करून येणार्‍यांनी चिंता वाढविली आहे. यामुळे शहरासोबतच ग्रामीणमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरत असल्याचे वास्तव आहे. दैनंदिन रुग्णसंख्याही सातशेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. शुक्रवारी दुबई रिटर्न पंधरा जणांसह तब्बल 698 नव्या बाधितांची भर पडल्याने प्रशासन अलर्टवर आले आहे. तर दिवसभरात केवळ 132 जण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.