Video : नागपूर मनपाचे कर्मचारी कार्यालयात रमी, पत्ते खेळ, परभणीच्या गंगाखेड नगरपरिषदेत गटारीची पार्टी
नागपूर महापालिका कार्यालय

Video : नागपूर मनपाचे कर्मचारी कार्यालयात रमी, पत्ते खेळ, परभणीच्या गंगाखेड नगरपरिषदेत गटारीची पार्टी

| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 2:34 PM

नागपूर महानगरपालिकेतला धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. पालिकेचे कर्मचारी कार्यालयातील संगणकावर  कार्यालयात पत्ते आणि रमी  खेळत असल्याचा प्रकार पुढे आलाय.

नागपूर महानगरपालिकेतला धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. पालिकेचे कर्मचारी कार्यालयातील संगणकावर  कार्यालयात पत्ते आणि रमी  खेळत असल्याचा प्रकार पुढे आलाय. कार्यालयात रमी खेळतानाचा व्हिडीओ ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागलाय.  शिवसैनिक नितीन सोळंके यांनी मोबाईलवर हा व्हिडीओ शुट केलाय. महानगरपालिकेतल्या सामान्य प्रशासन विभागातला धक्कादायक प्रकार घडलाय.  तर दुसरीकडे परभणीच्या गंगाखेड नगर पालिकेच्या  बाळासाहेब ठाकरे सभागृहात गटारीची पार्टी रंगल्याचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय…हॉटेल समजून चक्क नगर परिषद कार्यालयातच गटारी साजरी केल्याचा संतापजनक प्रकार या व्हिडिओ नंतर ऊघडकीस आला आहे… स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात अनेक जण बिर्याणीवर ताव मारतांना यात दिसत आहेत.
नागपूर आणि परभणी जिल्ह्यात घडलेल्या या प्रकाराबद्दल काय कारवाई होणार याकडे लक्षं लागलं आहे.