
दहा वर्षे नागपुरात राहणारा नूर मोहम्मद तालिबान्यांमध्ये सामिल झाल्याचा संशय
बनावट कागदपत्रांच्या आधारे गेली जवळपास दहा वर्ष नागपूरमध्ये मुक्काम केलेला नूर मोहम्मद तालिबान्यांच्या गोटात सामील झाल्याच्या शक्यतेमुळे पोलिसांचं टेंशन वाढलं आहे. अवैध वास्तव्याप्रकरणी त्याच्यावर तडिपारीची कारवाई करण्यात आली होती
दहा वर्षे नागपुरात राहणारा नूर मोहम्मद तालिबान्यांमध्ये सामिल झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नूर मोहम्मदचा हातात बंदूक घेतलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे ही भीती व्यक्त केली जात आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे गेली जवळपास दहा वर्ष नागपूरमध्ये मुक्काम केलेला नूर मोहम्मद तालिबान्यांच्या गोटात सामील झाल्याच्या शक्यतेमुळे पोलिसांचं टेंशन वाढलं आहे. अवैध वास्तव्याप्रकरणी त्याच्यावर तडिपारीची कारवाई करण्यात आली होती. त्याला दिल्लीमार्गे अफगाणिस्तानला पाठवण्यात आलं होतं. याशिवाय त्याची कुठलीही गुन्हेगारी समोर आली नव्हती, असं पोलिसांनी सांगितलं.
तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आता अनेक वादग्रस्त निर्णय घेण्यास सुरुवात केलीय. महिलांवरील निर्बंधांसोबतच तालिबान्यांनी आता अफगाणिस्तानचं नवं नाव (Afghanistan new name) ठेवल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे हेच नाव तालिबानने 1996-2001 मधील आपल्या राजवटीतही दिलं होतं. मात्र, नंतर अमेरिकेसह नाटोच्या सैन्याने तालिबानचा पराभव करत नावात बदल केला. आता पुन्हा अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर तालिबानचा प्रमुख नेता मुल्ला अब्दुल बरादरने अफगाणिस्तानचं नाव अस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असं ठेवलंय