MVA Andolan : विधानभवन परिसर विरोधकांच्या घोषणाबाजीनं दणाणलं, बळीराजाच्या प्रश्नावरून सरकारला घेरलं
नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन केले. कापूस, सोयाबीन आणि धानाला योग्य भाव मिळावा अशी मागणी करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात घोषणाबाजी करण्यात आली. महेंद्र दळवींवरील व्हायरल व्हिडिओ आणि वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरही राजकीय वर्तुळात चर्चा झाली.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात महाविकास आघाडीने सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात शेतकरीविरोधी धोरणांविरोधात आवाज उठवण्यात आला. कापूस, सोयाबीन आणि धानाला योग्य हमीभाव न मिळाल्याने शेतकरी संकटात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. कापसावरील आयात शुल्क कमी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, त्यांना कवडीमोल भावाने कापूस विकावा लागत असल्याचे आंदोलकांनी नमूद केले. आंदोलनकर्त्यांनी गळ्यात कापसाच्या माळा घालून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. “शेतकरी उपाशी, आमदार तुपाशी” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. याव्यतिरिक्त, महेंद्र दळवींवरील व्हायरल व्हिडिओ आणि वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरही अधिवेशनात राजकीय चर्चा सुरू आहे.
Published on: Dec 09, 2025 01:09 PM
