WITT Global Summit : युवा बॅडमिंटन स्टारपासून ते खास क्रिकेटपटूपर्यंत ‘या’ खेळाडूंना ‘नक्षत्र सन्मान’

WITT Global Summit : युवा बॅडमिंटन स्टारपासून ते खास क्रिकेटपटूपर्यंत ‘या’ खेळाडूंना ‘नक्षत्र सन्मान’

| Updated on: Feb 25, 2024 | 8:00 PM

देशातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्क TV9 ने त्यांच्या संबंधित खेळांमध्ये समान यश संपादन केलेल्या आणि लोकांना प्रेरणा देणाऱ्या खेळाडूंचा 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' या विशेष कार्यक्रमात गौरव केला. भारताचा महान बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांनी युवा बॅडमिंटन स्टार अनमोल खरब आणि पॅरा-क्रिकेटर आमिर हुसैन लोन यांना नक्षत्र सन्मान...

नवी दिल्ली | 25 फेब्रुवारी 2024 : विविध खेळांमध्ये देशाला नावलौकिक मिळवून देणाऱ्या आणि कठीण परिस्थितीचा सामना करूनही खेळात आपला ठसा उमटवणाऱ्या खेळाडूंना TV9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या विशेष कार्यक्रमात नक्षत्र सन्मान प्रदान करण्यात आला. देशातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्क TV9 ने त्यांच्या संबंधित खेळांमध्ये समान यश संपादन केलेल्या आणि लोकांना प्रेरणा देणाऱ्या खेळाडूंचा ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या विशेष कार्यक्रमात गौरव केला. भारताचा महान बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांनी युवा बॅडमिंटन स्टार अनमोल खरब आणि पॅरा-क्रिकेटर आमिर हुसैन लोन यांना नक्षत्र सन्मान देऊन गौरव केला. दरम्यान, तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी, खेळांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली, ज्यामध्ये केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे यश आणि ते देशात आयोजित करण्याच्या सरकारच्या योजनांबद्दल भाष्य केले.

Published on: Feb 25, 2024 08:00 PM