महाराष्ट्रात काँग्रेस अॅक्शन मोडवर, ‘या’ दोन्ही जागा काँग्रेसला मिळणार, नाना पटोले यांचं आश्वासन!

| Updated on: Jun 05, 2023 | 9:56 AM

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभर सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातही सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

Follow us on

हिंगोली: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभर सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातही सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नांदेड आणि हिंगोली हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या कोट्यात आहेत, त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसला ती जागा मिळावी, अशी जोरदार मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. त्यामुळे नांदेड आणि हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेस लढवणार असल्याचं आश्वासन नाना पटोले यांनी दिलं आहे.टिळक भवन येथे पार पडलेल्या बैठकीत अश्वासन दिल्याची माहिती काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगांवकर यांनी दिली.दोन्ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी नाना पटोले यांनी माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर दिल्याची माहिती भाऊ पाटील गोरेगांवकर यांनी सांगितलं.