Nana Patole : नाना पटोलेंचे वकील सतीश उके ‘ईडी’च्या ताब्यात, पटोलेंचा केंद्रीय यंत्रणांवर हल्लाबोल

Nana Patole : नाना पटोलेंचे वकील सतीश उके ‘ईडी’च्या ताब्यात, पटोलेंचा केंद्रीय यंत्रणांवर हल्लाबोल

| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 12:28 PM

राज्यात ईडीचं धाडसत्र सुरुच आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीनं पहाटे धाड टाकली. जवळपास पाच तास चाललेल्या या धाडसत्रानंतर आता सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतलंय.

मुंबई : राज्यात ईडीचं धाडसत्र सुरुच आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीनं पहाटे धाड (ED Raid) टाकली. जवळपास पाच तास चाललेल्या या धाडसत्रानंतर आता सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतलंय. ईडीच्या या धाडीनंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर (Central Investigation Agency) जोरदार हल्ला चढवलाय. सतीश उके यांच्यावरील ईडीने टाकलेल्या धाडीनंतर नाना पटोले यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू’, अशा शब्दात नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

Published on: Mar 31, 2022 12:28 PM