स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडीचा निर्णय कळवा, पटोलेंचं पुणे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांना पत्र

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडीचा निर्णय कळवा, पटोलेंचं पुणे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांना पत्र

| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 12:05 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसदर्भातील आघाडी करण्याचा निर्णय कळवण्याचे पत्र पुणे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांना देण्यात आलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसदर्भातील आघाडी करण्याचा निर्णय कळवण्याचे पत्र पुणे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांना देण्यात आलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आघाडी करावी की नाही यासंदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवर घेऊन जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करुन कळवा, अशा सूचना नाना पटोले यांनी पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि पुणे शहराध्यक्ष यांना दिल्या आहेत. तर, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची यूती झालेली आहे.