Nashik Flood : नाशिककरांचा धोका टळला, गोदाघाटातील पाणी ओसरलं; पाण्यात गेलेल्या दुतोंड्या मारुतीचं आज दर्शन
नाशिकच्या गोदाघाट परिसरात काल गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केले होते. मुसळधार पाऊस आणि नदीतील पाण्याच्या विसर्गामुळे गोदाघाट परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. येथील प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीचे मंदिरही पूर्णपणे पाण्याखाली बुडाले होते. यामुळे भाविकांना मारुती रायाचे दर्शन घेणे शक्य नव्हते. मात्र, आता गोदाघाटातील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. काल पूर्णपणे पाण्याखाली असलेला दुतोंड्या मारुती […]
नाशिकच्या गोदाघाट परिसरात काल गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केले होते. मुसळधार पाऊस आणि नदीतील पाण्याच्या विसर्गामुळे गोदाघाट परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. येथील प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीचे मंदिरही पूर्णपणे पाण्याखाली बुडाले होते. यामुळे भाविकांना मारुती रायाचे दर्शन घेणे शक्य नव्हते. मात्र, आता गोदाघाटातील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. काल पूर्णपणे पाण्याखाली असलेला दुतोंड्या मारुती आता पुन्हा वर आला असून, त्याच्या कमरेपर्यंत पाणी आहे. सकाळी छातीपर्यंत पाणी होते, ते आता आणखी कमी झाले आहे.
गोदाघाट परिसरातील अनेक छोटी मंदिरेही पुराच्या पाण्यात बुडाली होती, ती आता हळूहळू उघडकीस येत आहेत. पाणी पातळी कमी झाल्याने नदीचा रुद्र अवतार देखील शांत झाला आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी गोदाघाट परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या. नाशिककरांना आणि भाविकांना दिलासा मिळाला आहे कारण आता पुन्हा दुतोंड्या मारुतीचे दर्शन घेणे शक्य झाले आहे.
