Girish Mahajan : राज ठाकरे यांच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, मला लहानपण…

| Updated on: Jan 12, 2026 | 12:19 PM

नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीवरुन राज ठाकरेंनी गिरीश महाजनांवर लाकूडतोड्या अशी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना महाजनांनी आपण नाशिकमध्ये २० हजार झाडे लावत असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी आपल्या वृक्षारोपण प्रकल्पाची माहिती दिली आणि विरोधकांच्या टीकेला अप्रत्यक्षपणे राजकीय प्रत्युत्तरही दिले.

नाशिकमधील एका सभेत राज ठाकरेंनी गिरीश महाजनांवर वृक्षतोडीच्या मुद्द्यावरुन लाकूडतोड्या अशी टीका केली होती. या टीकेला आता गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाजनांनी स्पष्ट केले की, ते नाशिकमध्ये २० हजार झाडे लावत आहेत. गिरीश महाजन म्हणाले, “मला लाकूडतोड्या म्हटले, तेव्हा मला लहानपणीची गोष्ट आठवली. देवतेने सोन्याची किंवा चांदीची कुऱ्हाड दिली तरी त्याने ती नाकारली.” राज ठाकरे पुढे असेही म्हणाले की, विरोधकांनी झाडे छाटण्यापूर्वी स्वतःच्या पक्षातले कार्यकर्ते छाटले आणि बाहेरून लोक आणून पक्षात लावतायत. यावरही गिरीश महाजन यांनी पलटवार केला. नाशिकमध्ये सात-आठ हजार झाडे लावली असून, पुढच्या दोन महिन्यांत २० हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. या झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली जात आहे. एकही वृक्षप्रेमी त्यांच्या वृक्षारोपण मोहिमेकडे फिरकला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Published on: Jan 12, 2026 12:19 PM