Shivsena UBT : नाशिकमध्ये ठाकरेंना पुन्हा धक्का बसणार? निकटवर्ती नेता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Shivsena UBT : नाशिकमध्ये ठाकरेंना पुन्हा धक्का बसणार? निकटवर्ती नेता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

| Updated on: Jun 02, 2025 | 5:45 PM

Nashik Political News : ठाकरेंचे निकटवर्ती नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले असल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलेलं आहे.

नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलेलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज नाशिकमध्ये आहेत. तर ठाकरेंचे निकटवर्ती नेते मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले बघायला मिळाले असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. नाशिक मधून या आधीच ठाकरे गटाला निर्मला गावित या शिंदे सेनेत गेल्याने धक्का बसला आहे. नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेला खिंडार पडलं असतानाच आता पुन्हा एकदा आता ठाकरे यांचे निकटवर्ती समजले जाणारे सुधाकर बडगुजर हे नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे आज संजय राऊत नाशिकमध्ये असतानाही हा प्रकार घडल्याने अधिक चर्चा रंगल्या आहेत.

सुधाकर बडगुजर हे ठाकरेंचे निकटवर्ती समजले जातात. दरम्यान, आपण काही मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटल्याचं बडगुजर यांनी यावेळी म्हंटलं आहे. तसंच आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं राऊत यांना माहीत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Published on: Jun 02, 2025 05:45 PM