Ajit Pawar : आता हा विषय माझ्या हातात… कृषीमंत्री कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Ajit Pawar : आता हा विषय माझ्या हातात… कृषीमंत्री कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jul 29, 2025 | 12:13 PM

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुंबईतील मंत्रालयातील अजित पवारांच्या अँटी-चेंबरमध्ये त्यांची भेट घेतली. माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्यामध्ये साधारण १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ त्यांच्यात चर्चा झाली.

राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारविरोधात वादग्रस्त वक्तव्य आणि अधिवेशनादरम्यान भर सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याच्या दाव्यानं गेल्या काही दिवसांपासून राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अशातच आज माणिकराव कोकाटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र या भेटीपूर्वी शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ अजित पवारांच्या भेटीला आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी या शिष्टमंडळाने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे उत्तम कृषिमंत्री आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊ नका, अशी मागणी दादांकडे केली. मात्र या मागणीवर अजित पवारांनी शिष्टमंडळाला स्पष्टच उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. ‘आता हा विषय माझ्या हातात नाही.’, असं अजित पवार म्हणाले. यामुळे कोकाटेंचे मंत्रिपद धोक्यात असल्याची चर्चा आहे.

Published on: Jul 29, 2025 12:13 PM