Manikrao Kokate : विधानभवनातील रमीचा ‘डाव’ पडला उघडा? मंत्री कोकाटेंना अजितदादांचा थेट फोन? अन्…

Manikrao Kokate : विधानभवनातील रमीचा ‘डाव’ पडला उघडा? मंत्री कोकाटेंना अजितदादांचा थेट फोन? अन्…

| Updated on: Jul 22, 2025 | 12:29 PM

एकीकडे शेती कर्जमाफीच्या वाद्यावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणं पुसली गेली असताना सभागृहात कृषीमंत्र्यांनी पत्त्यांचा डाव मांडल्यावरून संताप व्यक्त होत असताना अजित पवार यांनी कोकाटेंना थेट फोन केल्याची सूत्रांची माहिती आहे.

सभागृहात रमी खेळतानाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीमाना घेण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात रमी खेळणं चुकीचं असल्याचे म्हणत ते भूषणावह नाही. विधानभवनात गांभार्याने बसणं गरजेचं असल्याचेही त्यांनी म्हटले. सभागृहात रमी खेळतानाच्या कोकाटेंच्या व्हिडीओवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

तर काल तटकरेंकडून माणिकराव कोकाटेंच्या राजीमान्याचे संकेतही देण्यात आले. त्यामुळे अजित पवार आता कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या घडामोडी घडत असताना अजित पवार यांनी मंत्री कोकाटे यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अजित पवार यांनी कोकाटेंशी चर्चा केली. त्यानंतर आज माणिकराव कोकाटेंनी सकाळी दहा वाजता सिन्नर येथून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राजीनामा देण्यासारखं घडलं काय. मी काही विनयभंग केला आहे. चोरी केली आहे. माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही. मी केलं काय? असा सवाल त्यांनी केला.

Published on: Jul 22, 2025 12:29 PM