Baramati : अजित पवारच माळेगाव कारखान्याचा ‘दादा’, शरद पवारांना शून्य जागा अन् अजितदादाच चेअरमन…

Baramati : अजित पवारच माळेगाव कारखान्याचा ‘दादा’, शरद पवारांना शून्य जागा अन् अजितदादाच चेअरमन…

| Updated on: Jun 26, 2025 | 2:49 PM

माळेगावची साखर कारखान्याची निवडणूक अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली होती. स्वतःलाच चेअरमन घोषित करून कारखान्याच्या निवडणुकीत दादा उतरले आणि अजित पवारांच्या पॅनलने तब्बल २१ पैकी २० जागा जिंकत दणदणीत विजय सुद्धा मिळवला. तर शरद पवारांच्या पॅनलला एकही जागा मिळाली नाहीये.

कुणी माझ्या लाल आमचा पराभव करू शकत नाही असा इशारा देत स्वतःच्याच विजयाचा दावा अजित पवारांनी केला होता आणि अखेर माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला. माळेगाव कारखाना अजित पवारांच्या ताब्यात आलाय. स्वतःला चेअरमन घोषित करत अजित पवारांनी स्वतः निवडणूक लढवली आणि विजयी झालेत. १०१ पैकी ९१ मतं घेऊन अजित दादांचा दणदणीत विजय झाला. अजित पवारांच्या नीळकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकल्या.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच नीळकंठेश्वर पॅनल आणि चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलमध्ये थेट लढत झाली. सहकार बचाव पॅनलच्या रंजन तावरे यांचाही ३६२ मतांनी पराभव झालाय. तर शरद पवारांच्या बळीराजा सहकार पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडाला. एकही जागा पवारांच्या पॅनलला जिंकता आली नाही. अजित पवारांनी बारामतीमधल्या माळेगाव कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अजित पवार पंचाहत्तर वर्षांच्या प्रतिस्पर्धित चंद्रराव तावरे यांच वय काढत आव्हान देत होते. पण चंद्रराव तावरे यांच पॅनल पराभूत झालं असलं तरी त्यांनी स्वतःची एकमेव जागा जिंकून आणली.

Published on: Jun 26, 2025 02:49 PM