Eknath Khadse : गिरीश महाजनांचं नाव महिलांबाबत… चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या आमदाराला खडसेंनी केलं गप्प
'जवळपास मी 1980 पासून ते आतापर्यंत सक्रिय राजकारणात आहे. मी जवळपास 45 वर्षांपासून राजकारणात आहे. गिरीश महाजन हे मंत्री आहेत, ते अर्ध्या खात्याचे मंत्री आहे, मी बारा खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो. त्यांना पूर्ण खातं देखील मिळालेलं नाहीये.'
जळगावातील भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप होत असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेतली. यावेळी मंगेश चव्हाण यांनी खडसेंवर गंभीर आरोप करत अनैतिक संबंध असा उल्लेख करत त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. अशातच या गंभीर आरोपांवर एकनाथ खडसे यांनी जशास तसे प्रत्युत्तर देत आरोप करणाऱ्या आमदाराला चांगलंच गप्प केलंय.
‘गिरीश महाजन यांचं नाव मी घेतच नाही. प्रफुल्ल लोढा यांनी त्यांचं नाव घेतलं आहे तो तुमच्याच ताब्यात आहे. एक बटण दाबलं की संपूर्ण देशात खळबळ उडेल हे त्याने म्हटलंय. त्याने गिरीश महाजनांचं नाव का घेतलं? महिलांबाबत गिरीश महाजन यांचं नाव कायम पुढे का येतं?’, असा सवाल खडसेंनी करत प्रतीसवाल उपस्थित केलेत. मंगेश चव्हाण यांनी एक मोठा आरोप माझ्यावर केला, माझ्या चारित्र्यावर आरोप केला,तुमच्याकडे माझ्यासंदर्भात एक छोटी गोष्ट देखील पुरावा म्हणून असेल तर ती समजासमोर दाखवा, गप्पा मारू नका. जर तुम्ही पुरावा दिला तर मी सक्रिय राजकारणातून संन्यास घेईल, असं म्हणत मंगेश चव्हाणांना खडसेंनी आव्हान दिलंय.
