tv9 Marathi Special Report | राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात? चर्चांना उधाण

tv9 Marathi Special Report | राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात? चर्चांना उधाण

| Updated on: May 15, 2026 | 9:54 AM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल होत असून, पक्षाच्या आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी आता अजित पवार यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीत अजित पवार गटाचा प्रभाव वाढताना दिसत असून, पक्षाच्या आर्थिक व्यवहारांमध्येही कुटुंबीयांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे आता पक्षाच्या तिजोरीच्या चाव्या प्रत्यक्षात पवार कुटुंबीयांकडे गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या आर्थिक व्यवस्थापनात काही अडचणी निर्माण झाल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर पक्षाच्या आर्थिक घडामोडींमध्ये अधिक समन्वय राहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी पक्षाच्या आर्थिक व्यवहारांचे अधिकार अजित पवार, प्रफुल पटेल आणि पक्षाचे खजिनदार वाय. पी. त्रिवेदी यांच्याकडे होते. मात्र आता या व्यवस्थेत बदल करण्यात आला असून, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे आर्थिक व्यवहारांचे सर्वाधिकार देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Published on: May 15, 2026 09:54 AM
Follow Us