Nawab Malik जे जे रुग्णालयाच्या युरोलॉजी विभागात दाखल, किडनी विकाराचा त्रास असल्याची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना जे जे रुग्णालयातील यूरोलॉजी विभागात दाखल करण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना आज सकाळी ईडीनं मेडिकलसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना जे जे रुग्णालयातील यूरोलॉजी विभागात दाखल करण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना आज सकाळी ईडीनं मेडिकलसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. नवाब मलिक यांना किडनी विकाराचा त्रास असल्याची माहिती समोर आली आहे. आज नवाब मलिकांना डिस्चार्ज मिळणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. या आधी नवाब मलिकांची किडनी विकारासंदर्भात तपासणी झाल्याची माहिती मिळाली आहे.
