Rohit Pawar : त्यांचं लव्ह अँड हेट रिलेशनशिप अन् BMC निवडणुकीनंतर… महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य

Rohit Pawar : त्यांचं लव्ह अँड हेट रिलेशनशिप अन् BMC निवडणुकीनंतर… महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Dec 10, 2025 | 2:54 PM

रोहित पवार यांनी महाविकास आघाडीतील लव्ह अँड हेट संबंधांवर भाष्य करताना मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर कायमस्वरूपी राजकीय घटस्फोटाची शक्यता वर्तवली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून त्यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, सर्वच विभागांमध्ये भ्रष्टाचार असल्याचे म्हटले आहे. सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यावर आपला भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती आणि महायुतीच्या संबंधांवर सडेतोड भाष्य केले आहे. ते म्हणाले की, महायुतीमधील सध्याचे नाते हे “लव्ह अँड हेट रिलेशनशिप” असून, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्यांचा कायमस्वरूपी राजकीय घटस्फोट होईल. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात इतर पक्ष अशी लढत दिसेल, असा दावाही त्यांनी केला. अंजली दमानिया यांनी केलेल्या पुणे मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातील पार्थ पवार यांच्या अटकेच्या मागणीवर बोलताना, रोहित पवार यांनी सरकारने योग्य निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली. तसेच, भ्रष्टाचार सर्वच विभागांमध्ये सुरू असून, भाजपच्या भ्रष्टाचार प्रकरणांवरही आवाज उठवावा असे आवाहन त्यांनी केले. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळ्याच पक्षांमधील घोटाळे बाहेर काढले आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची केलेली प्रशंसा ही मध्यस्थीनंतर घडलेली घटना असून, रुसवा-फुगवा कशाला पाहिजे, असा सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.

Published on: Dec 10, 2025 02:54 PM