NCP : सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, पवारांच्या राष्ट्रवादीनं घेरलं अन् दादा म्हणाले… बायको कुठं जाते माहिती नाही

NCP : सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, पवारांच्या राष्ट्रवादीनं घेरलं अन् दादा म्हणाले… बायको कुठं जाते माहिती नाही

| Updated on: Aug 21, 2025 | 9:38 PM

अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवारांनी थेट संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि त्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं निशाणा साधलाय. विचारधारा सोडली नाही असं सांगून संघाच्या बैठकीला जायचं हा दुटप्पीपणा असल्याची टीका रोहित पवारांनी केलीये.

भाजपसोबत गेले तरी विचारधारा सोडलेली नाही असं अजित पवार वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांच्याच पत्नी खासदार सुनेत्रा पवारांनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि पवारांची राष्ट्रवादी तुटून पडली. भाजपच्या खासदार कंगना राणौत यांनी राष्ट्रसेविका समितीचा कार्यक्रम आयोजित केला. याच कार्यक्रमाला सुनेत्रा पवारही हजर होत्या. याची माहिती कंगनाने ट्विट करून दिली. ‘आज माझ्या घरी राष्ट्रसेविका समिती महिला शाखेचे आयोजन केलं. आपण सर्वजण एकत्र येऊन सनातन मूल्य, हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय चेतना आणखी प्रखर बनवू. आमचा संकल्प आहे की मानव सेवा, राष्ट्रनिर्माण आणि सनातन संस्कृतीच्या संरक्षणासाठी सतत कार्य करत राहू’, असं कंगना राणौत यांनी म्हणत काही फोटो ट्विट केले. ज्यात या फोटोवरून सुनेत्रा पवार आणि अजित पवारांसह त्यांच्या राष्ट्रवादिला संघावरून आणि विचारधारेवरून घेरलं जातंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Aug 21, 2025 09:38 PM