
बदलापूरात NDRF चे पथक दाखल, उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडली…
मुंबईतील सायन-माटुंगा, चुनाभट्टी, कुर्ला येथे पाणी साचल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. सकाळपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बदलापूरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे
मुंबई आणि उपनगरात कालरात्रीपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाला आहे. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आल्याने ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कार्यालयांना सुटी देण्यात आली आहे. सकाळपासून देखील ठाणे जिल्ह्यात जबरदस्त पाऊस कोसळत आहे. उल्हासनदीने साडे सतरा मीटर ही पुर रेषा ओलांडल्याने बदलापूरात एनडीआरएफची 35 जणांची टीम रवाना झाली आहे. उल्हासनगरातील पेट्रोल पंप देखील पाण्याखाली गेला आहे. कल्याण अशोक नगर परिसर जलमय झाला आहे. वालधुनी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या या अशोक नगरामधील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. घरामध्ये राहणारे रहिवासी घरे सोडून आपल्या नातेवाईकांकडे गेली आहेत.
Published on: Jul 25, 2024 2:54 PM
Related Video
पहिला सामना पावसाचाच, इंग्लंड-इंडिया सामना रद्द, चाहत्यांची निराशा
सत्य बाहेर आलंच... करिश्मा कपूरचं ते गुपित या अभिनेत्रीने केलं उघड
इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी सज्ज, कोण जिंकणार?
धो धो पाऊस... अभिनेत्याचा लग्जरी कार वाटेतच सोडून मेट्रोने प्रवास
ENG vs IND : इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकार लगावणारे भारतीय फलंदाज
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना