नव्या कोरोना विषाणूमुळे काळजी वाढली, दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमानं थांबवायला हवी- Rajesh Tope

| Updated on: Nov 27, 2021 | 4:09 PM

राजेश टोपे म्हणाले की, कोरोनाचा नवा सापडलेला विषाणू, लसीला निष्प्रभ करून वाढतो. याचा अभ्यास झाला आहे. हा काळजी करण्यासारखा व्हेरिएंट आहे, असा प्राथमिक अंदाज आहे. राज्य केंद्र सरकारला याबाबत पूर्ण माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांनी आफ्रिकेवरून येणारे विमान थांबवावे, अशी विनंती केली आहे.

Follow us on

कोरोनाच्या नव्या विषाणूने पुन्हा एकदा सामान्यांना धडकी भरवायला सुरुवात केली आहे. कारण आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्ती केलेली भीती आणि त्याबाबत दिलेला इशारा. सोबतच परदेशात सापडलेला नवा विषाणू, तिकडे आणि भारतातही वाढणारे कोरोना रुग्ण पाहता राज्यातील शाळा सुरू करायला आरोग्य मंत्र्यांनी तूर्तास तरी नाहरकत घेतली आहे. मात्र, केंद्र सरकारसह राज्य सरकारलाही एक मोलाचा सल्ला दिला आहे.

राजेश टोपे म्हणाले की, कोरोनाचा नवा सापडलेला विषाणू, लसीला निष्प्रभ करून वाढतो. याचा अभ्यास झाला आहे. हा काळजी करण्यासारखा व्हेरिएंट आहे, असा प्राथमिक अंदाज आहे. राज्य केंद्र सरकारला याबाबत पूर्ण माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांनी आफ्रिकेवरून येणारे विमान थांबवावे, अशी विनंती केली आहे. केंद्र शासन काय निर्णय घेणार याकडे आमचे लक्ष लागले आहे. मात्र, तूर्तास असा व्हेरिएंट देशात आढलेला नाही. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या लोकांनावर लक्ष ठेवतोय. त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. त्यांना 72 तासांची आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.