Nitesh Rane : …तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा ठाकरेंवर प्रहार
नितेश राणेंनी ठाकरे गटावर हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार, असेही ते म्हणाले. त्यांच्या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, रवींद्र चव्हाण वसई-विरार मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत, जिथे ते भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. यामध्ये भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरेंनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतल्याचं दिसतंय, असा पलटवार नितेश राणे यांनी केला आहे. मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार, आणि तो आपल्या गटाचाच असेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.
नितेश राणेंनी केलेल्या ट्वीटमध्ये, ठाकरे गटाला उत्तर भारतीय महापौरामुळे जितकी मिरची लागली, तितकी “बुरखेवाली महापौर” बनेल याची का लागली नाही, असा सवाल त्यांनी विचारला. यावरून ठाकरे गट हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राणेंनी केला. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणेंचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
Published on: Jan 01, 2026 03:43 PM
