Nitesh Rane | पुढील सुनावणीपर्यंत नितेश राणेंवर अटकेची कारवाई नाही, कोर्टाचे आदेश, सरकारचीही ग्वाही
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिसाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर सुनावणी देताना कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत राणे यांच्यावर अटकेची कारवाई करु नये असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिसाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर सुनावणी देताना कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत राणे यांच्यावर अटकेची कारवाई करु नये असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. पुढची सुनावणी शुक्रवारी घेण्यात येणार आहे. कोर्टाचा हा निकाल म्हणजे राणे यांच्यासाठी तात्पुरता दिलासा असल्याचे म्हटले जात आहे.
