Special Report | Nitesh Rane यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

Special Report | Nitesh Rane यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 9:54 PM

कोर्टानं पोलीस कोठडी सुनावल्यानंतर कणकवली पोलिस नितेश राणे यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मोठ्या राजकीय नाट्यानंतर अखेर नितेश राणे यांना मोठा झटका बसल्याचं पाहायला मिळत आहे.

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना मोठा झटका बसला आहे. कारण नगर पंचायत निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे स्थानिक नेते संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने (Sindhudurga District Court) नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. कोर्टानं पोलीस कोठडी सुनावल्यानंतर कणकवली पोलिस नितेश राणे यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मोठ्या राजकीय नाट्यानंतर अखेर नितेश राणे यांना मोठा झटका बसल्याचं पाहायला मिळत आहे.