Nitesh Rane : वळवळ बंद करा, नाही तर तुमच्या अब्बांकडे.. ; भाऊच्या धक्क्यावरून नितेश राणेंचा इशारा

Nitesh Rane : वळवळ बंद करा, नाही तर तुमच्या अब्बांकडे.. ; भाऊच्या धक्क्यावरून नितेश राणेंचा इशारा

| Updated on: May 28, 2025 | 3:43 PM

Bhaucha Dhakka fish market clash : भाऊचा धक्का येथे बांगलादेशी तसंच रोहिंग्यांकडून स्थानिक मच्छिविक्रेत्या महिलांना मारहाण झाल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी याठिकाणी भेट दिली आहे.

मुंबईमधल्या भाऊचा धक्का येथे स्थानिक मच्छिविक्रेत्या महिलांना बांगलादेशी तसंच रोहिंग्यांकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येताच मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांनी या ठिकाणी धाव घेत घटनेचा आढावा घेतला आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाची साद घालत बांगलादेशी रोहिंग्यांना थेट इशारा दिला आहे.

यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, जो काही प्रकार आमच्या भगिनींसोबत झाला तो काही आम्ही सहन करणार नाही, मी इथून ही धमकी देऊन जात आहे. हे काही कराचीचे बंदर नाही, हे हिंदू राष्ट्रातील हक्काचे बंदर आहे. बांगलादेशी Xडे फार वळवळ करत आहेत. पण इथून पुढे काही घडलं तर पोलिसांना काही कळवणार नाही, मग तुम्हाला पाकिस्तानातील अब्बांकडे तुम्हाला पाठवून देऊ, वळवळ लगेच बंद करा, असा थेट इशाराच राणे यांनी दिलेला आहे.

Published on: May 28, 2025 02:17 PM