Thane : मनसेची नाही तर भैय्यांची चालणार.. रिक्षाचलकाची भर रस्त्यात राज ठाकरेंना शिवीगाळ, व्हायरल VIDEO मुळे खळबळ!
ठाण्यातील परप्रांतीय रिक्षाचालकाच्या कथित मुजोरी प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी मराठी माणसाच्या अस्मितेवर जोर दिला. यावर भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला.
ठाण्यामध्ये एका परप्रांतीय रिक्षाचालकाने कथितरित्या राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या घटनेवरून राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी ठाणे हे मराठी माणसाचे बालेकिल्ले असल्याचे अधोरेखित केले. भाषावाद आणि प्रांतवादाच्या आधारावर प्रक्षोभक विधाने करून लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना राज ठाकरे यांनी लक्ष्य केले. आपल्या मुलांना इंग्रजी आणि जर्मन-फ्रेंच भाषा शिकवत असताना, हिंदीला विरोध करणे हा दुटप्पीपणा असल्याचे त्यांनी म्हटले. मराठी माणसावर कोणी अन्याय केल्यास त्याचे हातपाय तोडण्याची भाषा करत, मराठी माणसाचे रक्षण करण्याची भूमिका मनसे घेत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळे यांनी राज ठाकरे यांच्यावर भावनिक वातावरण तयार करून मतं घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. जात-धर्माचे राजकारण करून आता मतं मिळणार नाहीत, असे बावनकुळे यांनी म्हटले. कोणतीही निवडणूक शेवटची नसते, असे स्पष्ट करत प्रत्येक निवडणुकीला स्वतःचे महत्त्व असते, असे बावनकुळे म्हणाले.
