Anil Parab | रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना नोटीस, 24 तासानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ : अनिल परब

| Updated on: Nov 18, 2021 | 3:19 PM

आम्ही एसटी कामगारांना वेतनवाढ द्यायला तयार आहोत. पण केवळ प्रश्न बेसिक वेतनाचा आहे. तो चर्चा करून सोडवला जाईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. एसटी कामगारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेतील असंही अनिल परब यांनी सांगितलं.

Follow us on

रोजंदारी कर्मचाऱ्यांना काल नोटीस दिलीय. आज 24 तासची वेळ संपत आहे. कोण कामावर येत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. संपकरी कामावर न आल्यास 2016-2017 आणि 2019 च्या भरती प्रक्रियेतील वेटिंगवाल्यांचा विचार करावा लागेल, असं त्यांनी सांगितलं. कायदेशीर प्रक्रिया करूनच कारवाई केली जाईल. लोकांची सहानुभूती गेल्यास मग कर्मचारी अडचणीत येतील. सरकार चर्चेसाठी तयार आहेच. सर्व गोष्टींचा अभ्यास करून समिती अहवाल देईल. त्यातून लगेच मार्ग निघणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.