‘…आता मदतीचा ओघ येईल पण पुढे काय?’; भास्कर जाधव यांचा सरकारला थेट सवाल
या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून किमान २०० लोक मातीत गाडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान 98 जणांना शोधण्यात NDRF, पोलीस प्रशासन आणि अग्निशमच्या पथकाला यश आले आहे. रायगडमधील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या पायथ्याशी हे गाव आहे.
मुंबई, 20 जुलै 2023 | रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची मोठी घटना घडली आहे. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून किमान २०० लोक मातीत गाडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान 98 जणांना शोधण्यात NDRF, पोलीस प्रशासन आणि अग्निशमच्या पथकाला यश आले आहे. रायगडमधील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या पायथ्याशी हे गाव आहे. या घटनेवरून आता विरोधकांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरण्यास सुरूवात केली आहे. तर अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत. तर बाचवकार्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: लक्ष ठेवून आहेत. यावरून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी दरड कोसळ्याच्या घटनेवरून शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर त्यांनी यावेळी रायगडमधील अनेक घटनांचा उल्लेख करताना त्यांच्या आठवणी सांगितल्या. त्याचबरोबर ज्या या घटना घडत आहेत. त्यानंतर आपण अलर्ट होता. पण तर घटनेच्या आधी सरकार अलर्ट असेल तर अशा घटना होणारच नाहीत असेही त्यांनी म्हटलं आहे. तर आता टेक्नॉलॉजिमुळे भूगर्भात काय घटना घडत आहेत याचा अभ्यास व्हायला हवा असेही त्यांनी म्हटलं आहे. तर जे गेले त्याच्या पाठीमागे जे आहेत त्यांचे पुढे काय? हा प्रश्न आहे. आता मदतीचा ओघ येईल पण पुढे काय? असा सवाल त्यांनी सरकारला विचारत त्यांच्या पुनर्वसनाचं काय असाही सवाल केला आहे.
