Laxman Hake : हे त्यांच्या पोटात दुखतंय, त्यांची पोरं… हाकेंकडून माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य, VIDEO व्हायरल झाल्यानंतर लक्ष्मण हाकेंचा दावा काय?
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एका व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये त्यांनी माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा करण्यात येत आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये लक्ष्मण हाके यांनी माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओमुळे मोठा वाद निर्माण झाला असून अनेक माळी संघटनांनी लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. “काय आहे, माळ्यांचं दुखणं एक आहे, ओबीसींचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे चाललं आहे. ही त्यांच्या पोटात दुखतंय” असं वक्तव्य या व्हायरल व्हिडीओमध्ये लक्ष्मण हाके करत असल्याचे पाहायला मिळतंय. मात्र या व्हायरल होणार्या व्हिडीओची टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही.
दरम्यान माळी समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर लक्ष्मण हाके यांनी व्हायरल होणारा व्हिडीओ हा खोटा असल्याचा दावा केला आहे. हा व्हिडीओ माझा आहे. पण त्यातील आवाज आपला नसल्याचे हाकेंनी म्हटलं आहे. ओबीसी जातींमध्ये फुट पाडण्यासाठी आणि त्यांच्यात भांडणं लावण्यासाठी हा प्रकार होतोय असा हाकेंचा आरोप आहे.
