ओमिक्रॉनचा धोका कुणाला?, काय करावं आणि काय नाही?; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला

| Updated on: Dec 05, 2021 | 12:18 PM

 कर्नाटक, गुजरातपाठोपाठ डोंबिवलीत ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मात्र, हा आजार वेगाने पसरत असला तरी घाबरून जाऊ नये असं आवाहन पुण्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केलं आहे.

Follow us on

मुंबई : कर्नाटक, गुजरातपाठोपाठ डोंबिवलीत ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मात्र, हा आजार वेगाने पसरत असला तरी घाबरून जाऊ नये असं आवाहन पुण्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केलं आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा लोकांनाच या आजाराचा अधिक धोका असल्याचंही भोंडवे यांनी सांगितलं आहे. तसेच हा आजार न होण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याची माहितीही त्यांनी दिली आहे.