Satish Bhosle Video : धसांचा कार्यकर्ता की डॉन? आधी कारच्या डॅशबोर्डवर फेकली नोटांची बंडलं आता हेलिकॉप्टरमधून…. आणखी व्हिडीओ समोर
अंजली दमानिया यांनी सकाळी सतीश भोसलेचा एक व्हिडिओ ट्विट केला होता. यानंतर सतीश भोसलेवर आजच एफआयआर दाखल करण्याची मागणीही दमानिया यांनी केली होती. यावेळी सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे त्यांनी म्हटले होते.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सकाळी सतीश भोसलेचा एक व्हिडिओ ट्विट केला होता. यानंतर सतीश भोसलेवर आजच एफआयआर दाखल करण्याची मागणीही दमानिया यांनी केली होती. यावेळी सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. सुरेश धस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे, असंही अंजली दमानिया यांनी म्हटल्याचे पाहायला मिळालं होतं. दमानिया यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये सतीश भोसले एका कारमध्ये बसला असून नोटांचे बंडल मोजताना दिसतोय. कारच्या पुढच्या सीटवर बसलेला सतीश भोसले हा नोटांचे बंडल मोजून झाल्यानंतर ते बंडल तो कारच्या डॅशबोर्डवर फेकतांनाही दिसतोय. दरम्यान, या व्हिडीओनंतर सतीश भोसले याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो एका हेलिपॅडवर उतरलेल्या हेलिकॉप्टरमधून बाहेर पडून चालताना दिसतोय. यावेळी सतीश भोसले पांढऱ्या कपड्यात असून त्यांच्या हातात मोबाईल फोन आणि गळ्यात सोन्याच्या चैनी हातात सोन्याचं ब्रेसलेट पाहायला मिळतंय. यावरून सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे की डॉन आहे? अशी चर्चा सध्या सुरू आहे.
