Dream11 Ban : आता ड्रिम 11 बंद! भारतात बेटिंग अन् ‘या’ Online गेम्सवर बॅन, नव्या गेमिंग बिलमध्ये नेमकं काय?
ऑनलाइन गेमिंग बिल 2025 ला मंजुरी मिळाली असून या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाले आहे ड्रीम 11 ॲपची सेवा बंद झाली आहे कोणत्याही सामन्यावर आता पैसे लावता येणार नाहीत ड्रीम 11 ॲपच बंद होण्याच्या मार्गावर आहे.
लोकसभा आणि राज्यसभेत ऑनलाइन गेमिंग प्रमोशन आणि रेग्युलेशन बिल 2025 पास करण्यात आले. या बिलामुळे ऑनलाइन गेमिंग क्षेत्रामध्ये मोठे बदल होणार आहेत. या विधेयकामुळे ऑनलाइन गेमिंग उद्योगात खळबळ माजली आहे. ऑनलाइन मनी गेमिंगवर पूर्णपणे बंदी घालणे आणि ई स्पोर्ट्स तसेच सामाजिक आणि शैक्षणिक गेम्सला प्रोत्साहन देणे हा या बिलामागचा मुख्य उद्देश आहे. ऑनलाइन गेमिंग बिल 2025 ला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे.
कोणत्या गेम्सवर बंदी येण्याची चिन्हे
ड्रीम 11, माई 11 सर्कल, हाऊसअॅट, माय टीम 11, खेलो फॅन्टसी, रमी सर्कल, जंगली रमी, पोकर बाजी, विंझो, गेम्स क्राफ्ट या गेम्समध्ये खेळाडू पैसे लावून वर्चुअल क्रिकेट किंवा इतर खेळांच्या संघाची निवड करून पैशाच्या स्वरूपात बक्षीस जिंकायचे. वरचे सर्व गेम्स पाहता याच्या जाहिराती अनेक कलाकार क्रिकेटर करायचे. सरकारच्या या नव्या बिलामुळे ड्रीम 11 किंवा माय 11च नाही तर ऑनलाइन रमी ही खेळता येणार नाही. केंद्र सरकारच्या बिलामुळे ऑनलाइन बेटिंग आणि पैशाच्या खेळावर पूर्णपणे बंदी येणार आहे. लोकांना चुकीच्या सवयी आणि आर्थिक नुकसानापासून वाचवण्यासाठी हे बिल आहे. याचा परिणाम क्रिकेट इंडस्ट्रीवर होणार आहे.
क्रिकेटचे मुख्य स्पॉन्स ऑनलाइन क्रिकेट गेम आहेत. या बिलामुळे क्रिकेट इंडस्ट्रीचे जवळपास 17 हजार कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यात जर कोणीही ऑनलाइन मनी गेम सर्व्हिस ऑफर करत असेल तर त्याला तीन वर्षांची शिक्षा आणि एक कोटींपर्यंत दंड लागू शकतो. गेम्सची जाहिरात करणाऱ्याला दोन वर्षांची शिक्षा आणि 50 लाखांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येईल पण या गेम खेळणाऱ्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा होणार नसून त्याला बिलमध्ये पिडीत मानण्यात आला आहे.
